VIDEO | ‘हे सीबीआयचं अपयश’; क्लोजर रिपोर्टवरून वडेट्टीवार यांचा सीबीआयवर हल्लाबोल
राज्याच्या राजकारणाला हादरवून टाकणारे फोन टॅपिंग प्रकरणाला आता पुर्णविराम लागला आहे. याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला असून सीबीआयने न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. तो आता न्यायालयाने स्वीकारला आहे.
मुंबई : 26 ऑगस्ट 2023 | तत्कालिन महाविकास आघाडी सरकारला हादरवून सोडणारे प्रकरण म्हणजे फोन टॅपिंग प्रकरण. या प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यांवर राजकीय नेत्यांचे बेकायदा फोन टॅप करण्याचा ठपका ठेवण्यात आला होता. तर त्यांच्यावर बनगार्डण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) करत होती. याप्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जबाब देखील २०२२ मध्ये नोंदवण्यात आला होता. मात्र आता हे प्रकरण बंद झाले आहे.
या फोन टॅपिंगच्या कथित प्रकरणात सीबीआयकडून दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला आहे. त्यावरून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कायमचे बंद झाले आहे. त्यामुळे आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर याच्यामुळे मविआला मोठा धक्का बसला आहे. वडेट्टीवार यांनी हे सीबीआयचं अपयश असल्याचे म्हटलं आहे. तर आरोपींना पाठीशी घालण्याचा हा प्रकार असून जनतेचा सीबीआयवर विश्वास नाही. तर सीबीआय कुचकामी झाल्याची घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी सीबीआयवर केली आहे.
रश्मी शुक्ला या महाराष्ट्र गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना, त्यांनी मविआतील नेत्यांचे फोन टॅप केले होते असा आरोप त्यांच्यावर होता. त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बच्चु कडू, संजय काकडे, आशिष देशमुख यांचे फोन टॅप करण्यात आले होते.

'मोदींना पवार यांच्या बाजूला कसे..., ' काय म्हणाले संजय राऊत

तुळजा भवानी मातेच्या मूर्तीची जागा हलविणार ? काय आहेत घडामोडी

धनंजय मुंडेंना कोण वाचवतंय? अंजली दमानिया यांचा थेट आरोप काय?

राज ठाकरे-उदय सामंतांच्या भेटीने भुवया उंचावल्या, मनसे नेते म्हणाले..
