उपमुख्यमंत्र्याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, विजय वडेट्टीवार यांचा खोचक सल्ला
राज्याला सरकार स्थापन झाले तर अजूनही गृहमंत्री पदावरुन आणि इतर खाते वाटपावरुन चर्चा सुरुच आहे. येत्या १४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा शपथ विधी होणार असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खोचक सल्ला दिला आहे. राज्याला सरकार स्थापन झाले तर अजूनही गृहमंत्री पदावरुन आणि इतर खाते वाटपावरुन चर्चा सुरुच आहे. येत्या १४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा शपथ विधी होणार असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खोचक सल्ला दिला आहे.
राज्यात मंत्री पदाच्या वाटापावरुन अजूनही तोडगा निघालेला नाही. महाराष्ट्रात महायुतीला इतके प्रचंड बहुमत मिळूनही राज्यात खातेवाटप काही केल्या पूर्ण होत नाही अशी परिस्थिती आहे. येत्या १४ डिसेंबरला खात्याचे वाटप होऊन महाराष्ट्रातील मंत्री राजभवनात शपथ घेतील असे म्हटले जात आहे. मात्र महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि भाजपात खात्यांचे वाटपा करण्याचा फॉर्म्युला काही केल्या निश्चित होत नसल्याचे म्हटले जात आहे. आता भाजपातील २० नावांपैकी सहा नावांवर अजून दिल्लीतून शिक्कामोर्तब झाला नसल्याचे म्हटले जात आहे.यावर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यात गृहमंत्री मिळालेला नाही, दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यातील दोन नंबरचा कुठला आणि तीन नंबरचा कुठला, ठाण्याचा दोन नंबरचा का बारामती दोन नंबरचा याचे त्यांच्या छातीला बॅच लावावेत अशी सूचना विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.