भिडेची पिलावळ मात्र वेगळी भूमिका घेते; सरकार आता काय करणार? वडेट्टीवार यांचा थेट सवाल
भिडे यांनी अमरावतीत एका कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह असे वक्तव्य केलं होते. त्यावरून राज्यभर आंदोलन झाली होती. तर भिडे यांच्याविरोधात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी पुण्यात गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रपूर, 15 ऑगस्ट 2023 | श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी अमरावतीत एका व्याख्यानात वादग्रस्त व्यक्त केलं होतं. त्याची धग अजूनही कमी झालेली नाही. भिडे यांनी अमरावतीत एका कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह असे वक्तव्य केलं होते. त्यावरून राज्यभर आंदोलन झाली होती. तर भिडे यांच्याविरोधात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी पुण्यात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आता त्यांच्याविरोधात सरकारने कारवाई करावी अशी माघणी वाढत आहे. अशीच मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तर त्यांनी सरकारवर टीका देखील केली आहे. यावेळी वडेट्टीवार यांनी, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भगवा रॅली काढणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर महाराष्ट्र सरकारने तातडीने देशद्रोहाची कारवाई करावी अशी मागणी केली आहे. हा अपमान सहन करण्यासारखा नसून ज्यांनी भिडेंना गुरुजींची उपमा दिली आहे, त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांचे यात काय म्हणणे आहे हेही महाराष्ट्राला समजले पाहिजे असेही वडेट्टीवार म्हणाले. देशाचे पंतप्रधान आज तिरंग्याला नमन करत असताना भिडेची पिलावळ मात्र वेगळी भूमिका घेते यावर महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेते याकडे जनतेचे लक्ष लागले असल्याचेही वडेट्टीवार म्हणालेत.