‘सामनातून त्यांच्यावर झालेल्या अन्यायला वाचा फोडण्यात आलीय’; वडेट्टीवार यांचा भाजपवर घणाघात
ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यावरून आता भाजपकडून आंदोलने केली जात आहेत.
मुंबई : 20 ऑगस्ट 2023 | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून काल टीका करण्यात आली होती. त्यात ते आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, मात्र मुख्य चे ‘उप’ झाल्याने वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली. तर ‘उप’ची नशा ही देशी बनावटीची असते. त्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या झोकांड्या जातायत. फडणवीस, सांभाळा! अशी टीका करण्यात आली होती. त्यावरून आता भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. तर भाजपकडून राज्यभर खासदार संजय राऊत आणि दैनिक सामनाच्या विरोधात आंदोलन केली जात आहेत. यावरूनच विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे. वडेट्टीवार यांनी सामनातील भाषा नीट वाचली. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना सपोर्ट करण्यात आलेला आहे. तर सामनातून त्यांच्यावर झालेल्या अन्यायलाच वाचा फोडण्यात आली आहे. त्यांना का मुख्यमंत्रीवरून उपमुख्यमंत्री केलं? त्यांची गुणवत्ता अभ्यास पाहता आज त्यांची मात्र कुचंबना होते आहे. त्यांचा जाणून बुजून सन्मान कमी करण्याचा प्रयत्न होत आहे असं अशी शंका विजय वडेट्टीवार यांनी उपस्थिती केली…