Kolhapur : पंचगंगा नदी 66 फुटांवर, नदीकाठच्या गावे अन् नागरिकांना सतर्कतेचा प्रशासनाचा इशारा

Kolhapur : पंचगंगा नदी 66 फुटांवर, नदीकाठच्या गावे अन् नागरिकांना सतर्कतेचा प्रशासनाचा इशारा

| Updated on: Aug 10, 2022 | 5:52 PM

राधानगरी धरणातून (Dam) पाणी विसर्ग होत असल्यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच श्री क्षेत्र नरसेवाडी मंदिरामध्ये कृष्णा व पंचगंगा नदीचे पाणी आले आहे.

कोल्हापूर : इचलकरंजी शहराची पंचगंगा नदी (Panchaganga river) सध्या 66 फुटावर वाहू लागली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. इचलकरंजी कर्नाटकला जोडणाऱ्या मोठा पूल व वाहतूकीसाठी खुला आहे. तर छोटा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. इचलकरंजी (Ichalkaranji) महापालिका आपत्ती व्यवस्थापनाकडून कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर नदीकाठावरील श्री वरदविनायक मंदिरामध्ये पूर्ण पाणी आले. तसेच आजूबाजूच्या शेतामध्ये पुराचे पाणी घुसले आहे. राधानगरी धरणातून (Dam) पाणी विसर्ग होत असल्यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच श्री क्षेत्र नरसेवाडी मंदिरामध्ये कृष्णा व पंचगंगा नदीचे पाणी आले आहे. अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होऊ लागला आहे, त्यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

Published on: Aug 10, 2022 05:28 PM