Special Report | अन् विनायक मेटेंचा अपघात झाला
विनायक मेटे काल रात्री बीडमधून मुंबईसाठी निघाले होते. मात्र मीटिंगच्या आधीच विनायक मेटेंचा अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यूही झाला. त्यामुळे अपघातावरून काही जणांनी घातपाताचासुद्धा संशय व्यक्त केला आहे.पहाटे पाच वाजून पाच मिनिटांची विनायक मेटेंच्या वाहनाचा अपघात झाला.
विनायक मेटे काल रात्री बीडमधून मुंबईसाठी निघाले होते. मात्र मीटिंगच्या आधीच विनायक मेटेंचा अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यूही झाला. त्यामुळे अपघातावरून काही जणांनी घातपाताचासुद्धा संशय व्यक्त केला आहे.पहाटे पाच वाजून पाच मिनिटांची विनायक मेटेंच्या वाहनाचा अपघात झाला.मुंबई-पुणे महामार्गावरील भाटण बोगद्याजवळ आली. 13 ऑगस्टच्या रात्री बीडमधून विनायक मीटिंगची गाडी एका मीटिंगसाठी मुंबईकडे रवाना झाली, तेव्हा त्यांच्या कारमध्ये तीन जण होते. चालक एकनाथ कदम पुढे आणि त्यांच्या बाजूला नेत्यांचे सुरक्षा रक्षक पोलीस हवालदार राम दुबे बसलेले होते, तर विनायक मेटे मागच्या सीटवर डाव्या बाजूला बसलेले होते. पहाटे पाचच्या दरम्यान नेत्यांची गाडी मुंबई पुणे महामार्गावरच्या भाटण बोगद्याजवळ आली होती. हा महामार्ग एकूण सहा पदरी आहे. त्यामध्ये दोन नंबरच्या लेनवर मेटेंची गाडी होती, तर उजव्या बाजूच्या लेनवर दहा चाकी ट्रक होता. मात्र या दोन्ही गाड्या चालू असतानाच ट्रकवाल्याने अचानक आपले वाहन दोन नंबरच्या लेनवर घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच ट्रकला विनायक मेटेंचा अपघात झाला. कारमधील एअर बॅग्जमुळे मेटे यांचे ड्रायव्हर आणि सुरक्षारक्षक वाचला मात्र विनायक मेटेंच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले.