Vinayak Mete Accident: विनायक मेटे आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणे कठीण- अजित पवार

| Updated on: Aug 14, 2022 | 10:24 AM

विनायक मेटे आपल्यात नाही यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याची प्रतिक्रिया देत त्यांच्या कुटुंबियांना यातून सावरण्याची शक्ती ईश्वर देवो अशी प्रार्थना त्यांनी केली. या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणीही अजित पवार यांनी यावेळी केली.

विनायक मेटे (Vinayak Mete Accident) यांच्या अपघाती निधनानंतर राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. विनायक मेटे यांच्यासोबत आपण अनेकदा दौरे केले असून महाराष्ट्राच्या कुठल्या भागात समाजाची काय समस्या आहे याची खोलवर माहिती आणि अभ्यास त्यांना होता असे अजित पवार म्हणाले. सत्तेत असो वा नसो मराठा समाजाच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला असे पवार म्हणाले. माझ्या अतिशय जवळचा सहकारी आणि मराठा समाजासाठी भांडणारा नेता गमावला असल्याचे अजित पवार म्हणाले. विनायक मेटे आपल्यात नाही यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याची प्रतिक्रिया देत त्यांच्या कुटुंबियांना यातून सावरण्याची शक्ती ईश्वर देवो अशी प्रार्थना त्यांनी केली. या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणीही अजित पवार यांनी यावेळी केली.