Vinayk Mete: विनायक मेटेंच्या सुरक्षा रक्षकाला उपचारासाठी रुबी हॉलला हलवले

Vinayk Mete: विनायक मेटेंच्या सुरक्षा रक्षकाला उपचारासाठी रुबी हॉलला हलवले

| Updated on: Aug 15, 2022 | 12:39 PM

ढोबळे यांना पुण्यातील रुबी हॉल येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या सोबत फोनवरून संवाद साधला आहे.

 पुणे – शिवसंग्राम नेते विनायक मेटे (Vinayk mete )यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. या अपघातात विनायक मेटे यांच्या सोबत असलेल्या सुरक्षा रक्षक राम ढोबळेही(Ram Dhobale) गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्या प्रकृतीमध्ये अजून सुधारणा नाही. या अपघातात राम यांच्या डोक्याला व पोटाला मार लागला असल्याची माहिती जवळच्या नातेवाईकांनी दिली आहे. ढोबळे यांना पुण्यातील (Pune)रुबी हॉल येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या सोबत फोनवरून संवाद साधला आहे.

Published on: Aug 15, 2022 12:39 PM