पुन्हा बंडाळीला सुरुवात? शिंदेंच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला? पाहा काय म्हणाले विनायक राऊत...

पुन्हा बंडाळीला सुरुवात? शिंदेंच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला? पाहा काय म्हणाले विनायक राऊत…

| Updated on: Jul 06, 2023 | 4:27 PM

अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एन्ट्री केल्यामुळे एकनाथ शिंदे गटाची कोंडी झाल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे राजीनामा देण्याची चर्चा ही करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी धक्कादायक विधान केलं आहे.

रत्नागिरी : अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एन्ट्री केल्यामुळे एकनाथ शिंदे गटाची कोंडी झाल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे राजीनामा देण्याची चर्चा ही करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी धक्कादायक विधान केलं आहे.”अजितदादा आणि कंपनीने उडी मारली त्याच दिवशी शिंदे गटाच्या आमदारांची बंडखोरी करायला सुरुवात झाली आहे. त्यांचा उद्रेक होत आहे. तो थांबवताना एकनाथ शिंदे यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. आमचं पूर्वीचं घरच बरं होतं. मातोश्रीने साद घातली तर सकारात्मक प्रतिसा देऊ असं विधान काही मंत्र्यांनी केलं आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील आमदारांनी मातोश्रीशी संपर्क केला. मातोश्रीची क्षमा मागायलाही हे आमदार तयार आहेत,” असा दावा विनायक राऊत यांनी केला.

Published on: Jul 06, 2023 04:27 PM