देवेंद्र फडणवीस कितीवेळेस मस्जिदमध्ये जाऊन माथा टेकतात,आमच्याकडे फोटो; ठाकरेगटाच्या नेत्याचं टीकास्त्र

देवेंद्र फडणवीस कितीवेळेस मस्जिदमध्ये जाऊन माथा टेकतात,आमच्याकडे फोटो; ठाकरेगटाच्या नेत्याचं टीकास्त्र

| Updated on: Mar 26, 2023 | 11:53 AM

तउद्धव ठाकरे यांची आज मालेगावमध्ये सभा होतेय. या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते नाशिकमध्ये दाखल झालेत. ठाकरे गटाच्या नेत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. पाहा...

मालेगाव, नाशिक : उद्धव ठाकरे यांची आज मालेगावमध्ये सभा होतेय. या सभेसाठी ठाकरे गटाचे नेते नाशिकमध्ये दाखल झालेत. ठाकरे गटाचे नेते, खासदार विनायक राऊतदेखील नाशिकमध्ये आहेत. नाशिकमध्ये बोलताना राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कितीतरी वेळेस मस्जिदमध्ये जाऊन माथा टेकला आहे. याचे आमच्याकडे फोटोही आहेत. यांच्या पापाचा घडा भरत चालला आहे”, असं म्हणत विनायक राऊत यांनी टीका केली आहे. विनायक राऊत यांच्या या टीकेला भाजप आणि फडणवीस काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असेल.

देवेंद्र फडणवीस यांचं जुनं ट्विट

Published on: Mar 26, 2023 11:50 AM