एकनाथ शिंदे यांच्या 'त्या' वक्तव्यावर विनायक राऊत यांची प्रतिक्रिया; म्हणाले, एकनाथ शिंदे यांचं वागणं म्हणजे...

एकनाथ शिंदे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर विनायक राऊत यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “एकनाथ शिंदे यांचं वागणं म्हणजे…”

| Updated on: May 28, 2023 | 9:35 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांसोबतच्या झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांची सहानुभूतीची लाट राहिली नाही, त्यांना कामाने शह देऊ, असं वक्तव्य केलं होतं. तसेच तसेच उद्धव ठाकरे यांच्या मनात माझ्याबद्दल खूप द्वेष आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. यावर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांसोबतच्या झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरे यांची सहानुभूतीची लाट आता राहिली नाही, त्यांना कामाने शह देऊ, असं वक्तव्य केलं होतं. तसेच उद्धव ठाकरे यांच्या मनात माझ्याबद्दल खूप द्वेष आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. यावर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “उद्धव ठाकरे यांचा द्वेष गद्दारीवर, कृतघन्तेवर आहे. ठाकरे यांचा द्वेष रास्त आहे, तो कुठेही कमी होणार नाही. सख्खा भाऊ पक्का वैरी अशा पद्धतीने एकनाथ शिंदे हे वागलेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा काय संपूर्ण महाराष्ट्राचा द्वेष या गद्दारांना भोगावा लागणार आहे”, असं विनायक राऊत म्हणाले.

Published on: May 28, 2023 09:35 AM