नारायण राणे नंगा नाच सुरुय, मंत्री हैदोस घालताहेत, शिंदे सरकार प्रशासनाचा दुरुपयोग करतंय

“नारायण राणे नंगा नाच सुरुय, मंत्री हैदोस घालताहेत, शिंदे सरकार प्रशासनाचा दुरुपयोग करतंय”

| Updated on: Oct 14, 2022 | 1:19 PM

एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांच्यावर खासदार विनायक राऊत यांनी गंभीर आरोप केलेत.

मनोज लेले, प्रतिनिधी, रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी गंभीर आरोप केलेत. नारायण राणे यांनी नंगा नाच करत आहेत. ते चालतं. तुमचे मंत्री, नेते हैदोस घालत आहेत. पोलीस आणि प्रशासन यांचा शिंदे सरकार दुरूपयोग करत आहे, असा गंभीर आरोप राऊतांनी (Vinayak Raut) केला आहे. त्याला कायदेशीर उत्तर देऊ, असंही ते म्हणालेत.