नितीन देसाई यांच्या मृत्यूप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्याचा पंतप्रधान मोदी यांच्यावर गंभीर आरोप; म्हणाला…
नितीन देसाईंचा मानसिक छळ केला जात असल्याचं म्हटलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई, 07 ऑगस्ट, 2023 | काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी एनडी स्टुडीओमध्ये आपलं जीवन संपवलं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची ऑडिओ क्लिप आणि काही साहित्य पोलिसांच्या हाती लागले. त्यातून नितीन देसाईंचा मानसिक छळ केला जात असल्याचं म्हटलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, एडलवाईस कंपनीचे संचालक रसेश शाह यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे अनेक फोटो समोर आले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या माणसांना कंटाळून नितीन देसाईंनी आत्महत्या केली. स्टुडीओचे रक्षण शिवसैनिक करतील, तो कुणाच्याही घशात जाऊ देणार नाही.
Published on: Aug 07, 2023 08:48 AM
Latest Videos