राज ठाकरेंच्या सभेत नियमांचे उल्लंघन?

राज ठाकरेंच्या सभेत नियमांचे उल्लंघन?

| Updated on: May 03, 2022 | 9:58 AM

राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेत नियमांचे उल्लंघन झाल्याची माहिती समोर येत आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे सभेचा तपास अहवाल गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे.

एक मे रविवारी राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा झाली. या सभेला पोलिसांनी तब्बल 16 अटींसह परवानगी दिली होती. अटींचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला होता. दरम्यान या सभेत नियमांचे उल्लंघ झाल्याची माहिती समोर येत आहे. सुत्रांकडून मिळत असल्या माहितीप्रमाणे या सभेचा तपास अहवाल गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात आला असून, आज गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Published on: May 03, 2022 09:58 AM