Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला दोन दिवसांची सीआयडी कोठडी ठोठावण्यात आली आहे. या हत्या प्रकरणात विष्णू चाटे याच्यावरही मकोका लावण्यात आला आहे. विष्णू चाटे हा संघटित गुन्हेगारीचा भाग आहे असं सरकारी वकिलांनी कोर्टात म्हटलं हो
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला दोन दिवसांची सीआयडी कोठडी ठोठावण्यात आली आहे. या हत्या प्रकरणात विष्णू चाटे याच्यावरही मकोका लावण्यात आला आहे. विष्णू चाटे हा संघटित गुन्हेगारीचा भाग आहे असं सरकारी वकिलांनी कोर्टात म्हटलं होतं, विष्णू चाटेच्या चौकशीसाठी कोठडी हवी असा युक्तिवाद वकिलांनी न्यायालयात केला होता. त्यांची ही मागणी मान्य करत न्यायालयाने विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी दिली आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. सुदर्शन घुले,प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे आणि जयराम चाटे या सर्व आरोपीवर मोक्का लावण्यात आला.हत्येमध्ये वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे, पण वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही. म्हणून वाल्मिक कराडवर मोक्का लावलेला नाही.