काँग्रेसचा गट नक्की फुटणार, संजय शिरसाट यांच्या दाव्यात किती तथ्य? विश्वजीत कदम स्पष्टच बोलले…
एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार यांनी बंड करत ते सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यानंतर आता काँग्रेस फुटणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. यावर काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे, 17 जुलै 2023 | एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार यांनी बंड करत ते सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यानंतर आता काँग्रेस फुटणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी काँग्रेस बाहेर पडणार हे निश्चित आहे. काँग्रेसचं घर फुटणार हे वारंवार सांगतोय, असं मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राजकारणात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “2019 मध्ये स्व. पतंगराव कदम यांचं निधन झाल्यापासून अशा चर्चा सुरु आहेत.अशा बातम्या कोण पेरतात मला माहित नाही. ही जुनी बातमी आहे. महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर करण्याकरता अशा बातम्या पसरवल्या जात आहे. काँग्रेस एकसंघ आहे आणि राहील.”
Published on: Jul 17, 2023 09:41 AM
Latest Videos