मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा कसा असणार? भाविकांसाठी सोई-सुविधा काय? गहिनीनाथ महाराजांनी सांगितली रुपरेषा…
आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरात दाखल झाले आहेत. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा करणार आहेत. उद्या पहाटे म्हणजे 29 जूनच्या पहाटे मुख्यमंत्री विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी मंदिरात जाणार आहेत.
सोलापूर: आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरात दाखल झाले आहेत. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा करणार आहेत. उद्या पहाटे म्हणजे 29 जूनच्या पहाटे मुख्यमंत्री विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी मंदिरात जाणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन आता सज्ज झालं आहे. आषाढी यात्रेनिमित्त मंदिरे समितीच्या वतीने भाविकांना सोयी-सुविधा पुरवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर दौरा कसा असणार? मंदिर प्रशासनाने नेमकी काय तयारी केली याची माहिती मंदिरे समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. गहिनीनाथ महाराज नेमकं काय म्हणाले, यासाठी पाहा हा व्हिडीओ….
Published on: Jun 28, 2023 07:41 PM
Latest Videos