का? राज्य महिला आयोगाने हात टेकलेत का? उर्फीवरून चित्रा वाघ यांचा प्रश्न
महाराष्ट्रामध्ये शिंदे- फडणवीस यांचं सजग सरकार आहे. महिला आणि मुलींच्या बाबतीत हे सरकार सजग आहे. त्यामुळे मतभेद सोडून छत्रपतींचा आदर्श आणि साऊ माईंचे संस्कार जपूया असे आवाहन वाघ यांनी केलं आहे
मुंबई : मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ व उर्फीमधील वाद संपायचं काही नाव घेत नाही. त्यावरून चित्रा वाघ यांनी उर्फीचा हा चालेला नांगनाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही.” असं म्हटलं आहे. तर यावरून चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना लक्ष्य केलं होतं.
तसेच उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं महिला आयोग समर्थन करतंय का?, असा सवाल चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना केला आहे. तसेच उर्फीबरोबर महिला आयोग सुद्धा बेफाम झालं आहे का? ट्वीटरवर आलेल्या बातमीची दखल घेऊन महिला आयोगाने वेब सीरीजच्या अभिनेत्री आणि दिग्दर्शकाला नोटीस बजावली होती.
त्याचबरोबर वाघ यांनी या महाराष्ट्रामध्ये शिंदे- फडणवीस यांचं सजग सरकार आहे. महिला आणि मुलींच्या बाबतीत हे सरकार सजग आहे. त्यामुळे मतभेद सोडून छत्रपतींचा आदर्श आणि साऊ माईंचे संस्कार जपूया असे आवाहन वाघ यांनी केलं आहे