Walmik Karad : तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, ‘हे’ दोघे वाल्मिक कराडच्या अंगावर धावले अन्…

| Updated on: Mar 31, 2025 | 1:52 PM

मकोका अंतर्गत शिक्षा भोगत असलेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर आज तुरूंगात हल्ला करण्यात आला. दरम्यान कराडला झालेल्या मारहाणीबाबत जेल प्रशासनाने अद्याप कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.

बीडच्या तुरूगांत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका अंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरूंगात मारहाण करण्यात आली. महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांच्याकडून वाल्मिक कराडला मारहाण झाल्याची माहिती मिळतेय. वाल्मिक कराडने एका केसमध्ये अडकवल्याचा राग मारहाण करणाऱ्यांना होता. म्हणून वाल्मिक कराडला तुरूंगात असताना बेदम मारहाण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. इतकंच नाहीतर तर आठवड्यापासून बीड तुरुंगात शिक्षा भोगत असेलेल्या आरोपी महादेव गित्ते, अक्षय आठवले आणि वाल्मिक कराड यांच्या गँगमध्ये तणावाचं वातावरण होतं अशी माहिती देखील मिळतेय. दरम्यान,  सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपी मकोका अंतर्गत बीड तुरूंगात आहेत. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले बीड मधील तुरुंगात ज्या बॅरेकमध्ये आहेत. त्याच्या बाजूच्या बॅरेकमध्ये अक्षय आठवले आणि परळीतील महादेव गीते हा आरोपी शिक्षा भोगत आहेत. यांच्यात काहीतरी बाचाबाची झाली असून या बाचाबाचीचं रूपांतर मारहाणीत झाल्याची माहिती मिळत आहे.

Published on: Mar 31, 2025 01:51 PM
Anjali Damania : कराडला तुरूंगात मारहाण? अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘या टोळ्यांमध्ये दुश्मनी…’
Mahadev Gitte : हत्या प्रकरणात जेलमध्ये आला, कराडने फसवल्याचा आरोपही केला.. कराडला मारणारा महादेव गीते कोण?