Walmik Karad : कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
Walmik karad - Mahadev Gite Dispute : बबन गीते नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आली आहे. वाल्मिक कराड याला बीड तुरुंगात झालेल्या मारहाणीनंतर ही पोस्ट करण्यात आलेली आहे.
”अंदर मारना, या मरना सबकुछ माफ है..” अशी पोस्ट बबन गीते नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आली आहे. वाल्मिक कराड याला बीड तुरुंगात झालेल्या मारहाणीनंतर ही पोस्ट करण्यात आलेली आहे. तर पोस्ट करणारा हा बबन गीते हा गेल्या 9 महिन्यांपासून फरार आहे.
बीडच्या कारागृहात आज संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण करण्यात आली आहे. आरोपी महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनी ही मारहाण केल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर एकीकडे तुरुंग प्रशासन मारहाण झाल्याचं फेटाळत असलं तरी दुसरीकडे महादेव गीतेसह 4 आरोपींना तत्काळ संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात पाठवण्यात आलं आहे. तर हा सर्व प्रकार घडत असताना सोशल मीडियावर बाबन गीते नावाच्या फेबबुक अकाऊंटवरून मात्र ”अंदर मारना, या मरना सबकुछ माफ है..” अशी पोस्ट करण्यात आली आहे. हा बबन गीते गेल्या 9 महिन्यांपासून फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय

'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी

'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात

'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
