Imtiaz Jalil : ‘त्यांच्याकडे बहुमत आहे, पण आम्ही..’; वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना
Waqf Amendment Bill 2025 : वक्फ बोर्ड विधेयक आज पुन्हा एकदा संसदेत सादर झालं आहे. त्यावर आता एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
वक्फ बोर्डाची संपत्ती ही मुस्लिम समाजाची संपत्ती आहे, असं एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हंटलं आहे. वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यास कोर्टात जाऊ असंही त्यांनी म्हंटलं आहे. वक्फ विधेयक आज संसदेत मांडलं जात आहे. वक्फ विधेयकाला याआधी विरोधकांनी जोरदार विरोध केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा सुधारित वक्फ विधेयक आज लोकसभेत मांडलं गेलं आहे. त्यावर चर्चा देखील झाली आहे. त्यानंतर आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी वक्फ बोर्डाची संपत्ती ही मुस्लिम समाजाची आहे. मुस्लिम लोकांनी दान केलेली ही संपत्ती आहे. सरकारकडे बहुमत असल्याने ते हे बिल पास करून घेतील. मात्र आमची देखील तयारी आहे. बिल पास झालं तर आम्ही कोर्टात जाऊ. कारण आम्हाला अजूनही देशाच्या न्यायप्रणालीवर विश्वास आहे.

पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड

गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला...

'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट...

हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
