Wardha CCTV : धावत्या गाडीत चढताना पाय घसरला! मृत्यूच्या दाढेतून आरपीएफ जवानाने पाहा प्रवाशाला कसा वाचवला

Wardha CCTV : धावत्या गाडीत चढताना पाय घसरला! मृत्यूच्या दाढेतून आरपीएफ जवानाने पाहा प्रवाशाला कसा वाचवला

| Updated on: Jun 20, 2022 | 12:32 PM

ट्रेन सुरु झाल्याचे लक्षात येताच तो चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र त्याचा पाय घसरल्याने प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या मधील गॅपमध्ये तो पडू लागला.

वर्धेवरून (Wardha Railway Station) अकोला येथे जाण्याकरिता धावत्या रेल्वेगाडीत चढण्याच्या प्रयत्नात चढत असताना युवकाचा पाय घसरला आणि एक तरुण रेल्वे आणि प्लेटफार्म मधील गॅप मध्ये अडकला गेला. रेल्वे (Railway CCTV) खाली पडत प्रवाशाचा प्लॅटफॉर्मवर कर्तव्य बजावणाऱ्या आरपीएफ जवानाने (RPF Soldier saved passengers life) धावत जात प्रवाशाचा जीव वाचवलाय. ही घटना वर्धा रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर घडली. जीव वाचल्याने प्रवाशाने सुरक्षा बलाच्या रक्षकाचे आभार मानले. ही घटना रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झालीय. वर्धा रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर 12810 हावडा एक्सप्रेस रेल्वेगाडीचे आगमन झाले. काही वेळेत ही गाडी पुढील प्रवासाकरिता रवाना झाली. तेवढ्यातच वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्याच्या खरांगणा येथील 26 वर्षीय नितीन ढगे हा अकोला जाण्याकरिता प्लॅटफॉर्मवर आला. दरम्यान त्याला ट्रेन सुरु झाल्याचे लक्षात येताच तो चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र त्याचा पाय घसरल्याने प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या मधील गॅपमध्ये तो पडू लागला. ही बाब प्लॅटफॉर्मवर असलेल्या नागरिकांना दिसताच आरडाओरडा सुरु झाला. तेव्हा कर्तव्यावर असलेला आरपीएफचा रक्षक भागवत बाजड हा देवदूत बनून आला आणि स्वत:च्या जिवाची पर्वा न करता त्याने नितीनचा जीव वाचविण्यासाठी धाव घेतली. नितीन हा रेल्वेखाली जात होता. तेव्हा रेल्वे रक्षक भागवत बाजड याने दूर फरफटत जातं असलेल्या प्रवाशाला बाहेर ओढलं आणि त्याला धीर दिला. आरपीएफ रक्षक भागवत बाजड याच्या कामगिरीबाबत सर्वत्र कौतुक होतंय.