वाशिममध्ये अवकाळीचा प्रकोप सुरूच; बेलोरा नदीला आला मोठा पूर
त्याचबरोबर जोरदार अवकाळी पावसामुळं वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी येथील वाशिम कारंजा महामार्गावरील नदी दुथडी भरून वाहत असून मानोरा तालुक्यात बेलोरा येथील नदीला आला मोठा पुर आला आहे.
वाशिम : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस होत असून सोबत गारा आणि वादळीवाराही राहत आहे. यामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आणखी काही दिवस असेच चित्र कायम राहणार असल्याचा अंदाज नागपूर हवामान विभागाचे प्रादेशिक केंद्राकडून शुक्रवारी वर्तविण्यात आला होता. त्याप्रमाणे वाशिम जिल्ह्यात मागील सहा दिवसापासून अवकाळीचा प्रकोप सुरूच आहे. सततच्या पावसामुळे मानोरा तालुक्यात छोट्या-मोठ्या नदी नाल्यांना पूर येत आहे. तर अडाण धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. परिसरातील विहिरीच्या पाणी पातळी वाढ झाली आहे. त्याचबरोबर जोरदार अवकाळी पावसामुळं वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी येथील वाशिम कारंजा महामार्गावरील नदी दुथडी भरून वाहत असून मानोरा तालुक्यात बेलोरा येथील नदीला आला मोठा पुर आला आहे. त्यामुळं परिसरातील नागरिकांनी पूर बघण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.