Washim : ना रक्ताचे नाते, ना गडगंज श्रीमंत, तरीही 15 अंध मुलांचे पितृत्व स्विकारणारा ‘बाप माणूस’

Washim : ना रक्ताचे नाते, ना गडगंज श्रीमंत, तरीही 15 अंध मुलांचे पितृत्व स्विकारणारा ‘बाप माणूस’

| Updated on: Jun 20, 2021 | 8:47 AM

वाशिम तालुक्यात केकतउमरा नावाचे एक गाव आहे. या छोट्याशा गावात पांडुरंग उचितकर राहतात. पांडुरंग हे गावात पत्नी गंगासागर, एक मुलगी चेतना आणि अंध मुलगा चेतन यांच्यासोबत आपल्या संसाराचा गाडा हाकत आहे.

कोणतेही रक्ताचे नाते नसलेल्या एका व्यक्तीने चक्क 15 अंध मुलांचे पितृत्व स्विकारले आहे. पांडुरंग उचितकर असे या व्यक्तीचे नाव आहे. विशेष म्हणजे पांडुरंग यांना स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र तरीही त्या 15 अंध मुलांची संपूर्ण जबाबदारी ते न डगमगता पार पाडत आहेत.
वाशिम तालुक्यात केकतउमरा नावाचे एक गाव आहे. या छोट्याशा गावात पांडुरंग उचितकर राहतात. पांडुरंग हे गावात पत्नी गंगासागर, एक मुलगी चेतना आणि अंध मुलगा चेतन यांच्यासोबत आपल्या संसाराचा गाडा हाकत आहे. मात्र अंध चेतन याची समस्या पाहून त्यांचे मन हेलावले. यानंतर त्यांनी मनाशी ठाम निश्चिय करुन काही अंध विद्यार्थ्यांना आसरा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर पाहता पाहता त्यांच्या झोपडीत 15 अंध मूल जमा झाली.