Lalbaugcha Raja First Look Video | लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन, बघा लाडक्या बाप्पाची पहिली झलक

| Updated on: Sep 15, 2023 | 6:44 PM

VIDEO | मुंबईतील लालबागच्या राजाची ओखळ ही नवसाला पावणारा बाप्पा अशी असल्याने त्याचा थाटमाट हा काही औरच असते... Lalbaugcha Raja First Look घर बसल्या घ्या लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन

मुंबई, १५ सप्टेंबर २०२३ | अवघ्या काही दिवसांवर आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन प्रत्येकाच्या घरोघरी तर मुंबईतील प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये बाप्पाचा थाट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मुंबईतील लालबागच्या राजाची ओखळ ही नवसाला पावणारा बाप्पा अशी असल्याने त्याचा थाटमाट हा काही औरच असतो. लालबागच्या राजाची अनोखीच शान असल्याने लालबागच्या राजाच्या दर्शनाला लाखो भाविक रांग लावून दर्शन घेत असतात. मुंबईसह मुंबईच्या बाहेरुन देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक गर्दी करत असतात. आता या वर्षीही लालबागच्या राजाची पहिली झलक भक्तांना आज शुक्रवार 15 सप्टेंबर रोजी पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे मुंबईतील लालबागचा राजा जिथं विराजमान होतो, त्याच ठिकाणी या बाप्पाची मूर्ती साकारली जाते. त्यामुळे या बाप्पाची मिरवणूक नसली तरी या लाडक्या राज्याची पहिली झलक पाहण्यासाठी भाविक आतूर असतात.

Published on: Sep 15, 2023 06:41 PM
Sonya Maruti Ganapati ला चढणार नव्या आभूषणांचा साज; 21 किलो चांदी, 9 तोळे सोनं अन्…
Dombivli Building Collapse | डोंबिवली 3 मजली इमारत कोसळली अन्…