जेव्हा व्यंकय्या नायडूंनी मराठी भाषेतून रजनी पाटलांचं कौतुक केलं! म्हणाले, ‘तुम्ही खूप चांगलं…’
M. Venkaiah Naidu: व्यंकय्या नायडू यांनी मराठीतूनच रजनी पाटील यांचं कौतुक करत त्यांचं अभिनंदन केलंय. तुम्ही खूप चांगलं बोललात, असंही मराठीतून म्हणालेत.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी खासदार रजनी पाटील यांनी राज्यसभेत भाषण केलं. आपल्या भाषणानंतर खासदार रजनी पाटील यांचं व्यंकय्या नायडूंनीही कौतुक आणि अभिनंदत केला. तुम्ही फार चांगलं बोललात, असं म्हणत नायडूंनी रजनी पाटील यांच्या भाषणाचं कौतुक केलंय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी त्यांनी राज्यसभेत भाषण केलं. 15 वर्षांपूर्वी केंद्रानं तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला होता. त्यापाठोपाठ कन्नड मल्ल्याळम या भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. आता मराठीलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी राज्यसभेत करण्यात आली आहे. मराठी 52 बोली भाषा आहेत. मराठी भाषा अनेकांनी समृद्ध केली आहे. चारही महत्त्वाच्या निकषांवर मराठी भाषा खरी उतरली आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे. आता फक्त मंत्रिमंडळात यावर शिक्कामोर्तब होणं बाकी आहे, असंही रजनी पटेल यांनी म्हटलं. त्यामुळे आपण आपलं वजन वापरुन मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, यासाठी प्रयत्न करावे, अशीही मागणी रजनी पाटील यांनी यावेळी बोलताना केली आहे. यानंतर व्यंकय्या नायडू यांनी मराठीतूनच रजनी पाटील यांचं कौतुक करत त्यांचं अभिनंदन केलंय. तुम्ही खूप चांगलं बोललात, असंही मराठीतून म्हणालेत.