‘मिशन विदर्भ’वर आलेल्या मनसे नेत्याचं मिशन टायगर फत्ते! बजरंग वाघाच्या दर्शनाने अविनाश जाधव भारावले
Avinash Jadhav in Tadoba : विदर्भात सध्या मनसे नेते राज ठाकरे यांच्या दौऱ्याची राजकीय चर्चा रंगलीये, त्यात मनसे नेते अविनाश नेते यांनी मिशन विदर्भ दौऱ्यादरम्यान, ताडोबा सफारी केली. चकीत करणारी बाब म्हणजे यावेळी विदर्भातील प्रसिद्ध वाघाने त्यांना दर्शनही दिलं.
चंद्रपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत विदर्भ दौऱ्यावर असेलल्या मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav in Tadoba) यांनी ताडोबा अभयारण्याला भेट दिली. विशेष म्हणजे यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांना यावेळी व्याघ्रदर्शनही झालं. राज ठाकरे हे आज चंद्रपूर (Chandrapur) दौऱ्यावर आहेत. ‘मिशन विदर्भ’वर आलल्या मनसे नेत्यांनी मिशन टायगर मोहीम फत्ते केलीय. मनसे नेते अविनाश जाधव यांना ताडोबात वाघाचं दर्शन झालं. ताडोबात टायगर सफारी करताना अविनाश जाधव यांना विदर्भातील प्रसिद्ध वाघ बजरंग दिसला. ताडोबाच्या बफरमध्ये ते सफारी करत होते. त्यावेळी त्यांना वाघाचं दर्शन झालं. अगदी जवळून वाघ बघायला मिळाल्यानं अविनाश जाधवही खूश झाले. सध्या मनसेचे नेते विदर्भात दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ताडोबात जाऊन मनसे नेते अविनाश जाधव यांना व्याघ्रदर्शनाचा मोह आवारता आला नाही.