24 ते 27 दरम्यान 4 तासांसाठी पाणीकपात

24 ते 27 दरम्यान 4 तासांसाठी पाणीकपात

| Updated on: May 21, 2022 | 10:38 AM

मुंबई महापालिका क्षेत्रातील (Mumbai Municipal Area) 11 प्रभागांमध्ये चार दिवस पाच टक्के पाणीकपात (water drop) करणार असल्याचे महापालिकेच्या पाणी विभागाने जाहीर केले आहे. ही पाणीकपात 24 मे ते 27 मे या कालावधीत होणार आहे. 4 दिवस होणारी पाणी कपात मुंबईतील (Mumbai) कुलाबा ते मुलुंडपर्यंत असणार आहे.

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील (Mumbai Municipal Area) 11 प्रभागांमध्ये चार दिवस पाच टक्के पाणीकपात (water drop) करणार असल्याचे महापालिकेच्या पाणी विभागाने जाहीर केले आहे. ही पाणीकपात 24 मे ते 27 मे या कालावधीत होणार आहे. 4 दिवस होणारी पाणी कपात मुंबईतील (Mumbai) कुलाबा ते मुलुंडपर्यंत असणार आहे. विशेष म्हणजे सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत 5 टक्के पाणीकपात करण्यात येईल. त्यामुळे पाणी जपून वापरा असं आवाहन महापालिकेच्या पाणी विभागाकडून करण्यात आलं आहे. पिसे-पांजरापोळ येथे दुरूस्तीच्या कारणास्तव ही पाणीकपात करण्यात येणार आहे.

Published on: May 21, 2022 10:38 AM