Pune News : उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीबाणी; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
Water Drought In Parsul : पाणी टंचाईवर मात करण्यासाठी परसुल ग्राम पंचायतीकडून अजब फतवा काढण्यात आलेला आहे. 2 हांडा पेक्षा जास्त पाणी घेतल्यास 100 रुपये दंड अकरण्यात येणार आहे.
विहीरीतून तिसरा हंडा पाणी उपसाल तर 100 रुपये दंड भरावा लागेल असा अजब निर्णय ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेला आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातल्या परसुल ग्रामपंचायतीने हा नियम लावला आहे.
उन्हाळा सुरू होताच पाणी टंचाईचा सामना अनेक गावांना करावा लागत आहे. ग्रामीण भागात परिस्थिती बिकट होत चालली आहे. उन्हाळ्यात गावाला पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी गाव पातळीवर प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र अशातच आता परसुल ग्रामपंचायतीने काढलेल्या अजब नियमाने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. विहीरीतून 2 हंडा पाण्यापेक्षा एकही हांडा अधिक घेतला तर 100 रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचा नियम ग्राम पंचायतीने लावला आहे. या गावात कायमच पाणी टंचाई असते. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. त्यातच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी काढलेल्या या नियमामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी

आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'

औरंगजेब इथ गाडला असा बोर्ड लावा, राज ठाकरेंनी कबरीच्या वादावरून सुनावल

बीड हादरलं! तरुणाची दगडाने ठेचून हत्या, कन्नापुरमध्ये खळबळ
