ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई; साताऱ्यातील वाठार स्टेशन परिसरातील भीषण स्थिती
राज्यभरासह साताऱ्यात जोरदार पाऊस सुरु आहे. मात्र असं असताना सातारा जिल्ह्यातील पूर्व आणि उत्तर भागात ऐन पावसाळ्यात दुष्काळ जाणवतोय. कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन भागात भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे.
सातार, 28 जुलै 2023 | राज्यभरासह साताऱ्यात जोरदार पाऊस सुरु आहे. मात्र असं असताना सातारा जिल्ह्यातील पूर्व आणि उत्तर भागात ऐन पावसाळ्यात दुष्काळ जाणवतोय. कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन भागात भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. वाठारगावच्या शेजारी असणाऱ्या तळहिरा धरणातील पाण्याने तळ गाठल्यामुळे आठ दिवसातून एकदाच पाणीपुरवठा या गावाला केला जातोय. इथल्या नागरिकांना विकत पाणी घ्यावं लागतंय. या गावाची लोकसंख्या 5 हजार हून अधिक असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. शासनाचे टँकर सुरू करावी, आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही मार्गी लावावा अशी मागणी या ठिकाणचे स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. या गावाची भीषण परिस्थिती इथल्या नागरिकांनी मांडली आहे.
Published on: Jul 28, 2023 12:12 PM
Latest Videos