गुलाबराव पाटील यांचे राऊत यांना खुलं आव्हान; म्हणाले, ‘पंढरपुरात उभं…’
शिवसेना वाढविण्यासाठी घरावर तुळशी पत्र ठेवून कामं केली. पण आता आम्ही गद्दार. जर गद्दारी करायची असतीच तर राज ठाकरे, नारायण राणे गेले तेंव्हाच बाहेर पडलो असतो किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो असतो. पण तस नाही केलं आम्ही शिवसेना सोडली नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
पंढरपूर : बुलढाण्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी गद्दार, खोके ओकेवरून शिवसेना ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी गेली वर्षभर आम्ही गद्दार, खोके ओके ऐकत आहोत. पण ठीक आहे. आता 35 वर्षे आम्ही तिथेच घासली आहेत. शिवसेना वाढविण्यासाठी घरावर तुळशी पत्र ठेवून कामं केली. पण आता आम्ही गद्दार. जर गद्दारी करायची असतीच तर राज ठाकरे, नारायण राणे गेले तेंव्हाच बाहेर पडलो असतो किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो असतो. पण तस नाही केलं आम्ही शिवसेना सोडली नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
तर ज्यावेळेस विचारांचा विषय आला ज्यावेळेस बाळासाहेबांनी जी शिवसेना बांधली ती कुठेतरी लय जाते याचा विषय आल्यानंतरच तो निर्णय घेतला. मात्र राऊत सारख्या महा मंडलेश्वर 1008 ने शिवसेनेचे वाट लावली. उद्धव ठाकरे यांना चुकीचं ब्रह्मज्ञान दिलं. तर आम्ही संघटनेत खारीचा वाटा दिल्यानेच लोकांनी आम्हाला चार, पाच वेळा आमदार केलं. आता तर सुप्रीम कोर्टाने देखील आमच्या पक्षाला मान्यता दिलेली आहे. मग तुम्ही आम्हाला गद्दार म्हणणारे तुम्ही कोण? असा सवाल करताना, आम्ही जनतेतून निवडूण येतोय तर हा नेत्यांच्या तुकड्यावर. याची नगरसेवका येवढिही लायकी नाही. हिंमत असेल तर ये आणि उभ रहा म्हणावं पंढरपुरात ग्रामपंचायतीच्या निवडणूकीला असं आव्हान केलं आहे.