‘वाटेकरी वाढल्यानंतर राष्ट्रवादीला खाती ही द्यावीच लागणार’; खाते वाटपावरून शिवसेना नेत्याची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खातं देण्यात येऊ नये अशी मागणी शिंदे गटातील आमदारांनी लावून धरली होती. मात्र काल झालेल्या खातेवाटपावरून अर्थ खात्याबरोबर दुसरी महत्त्वाची खाती देखील राष्ट्रवादीच्या पारड्यात पडल्याची समो आली आहेत.
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्याने अनेकांच्या मनात भीती होती. तर राष्ट्रवादी नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खातं देण्यात येऊ नये अशी मागणी शिंदे गटातील आमदारांनी लावून धरली होती. मात्र काल झालेल्या खातेवाटपावरून अर्थ खात्याबरोबर दुसरी महत्त्वाची खाती देखील राष्ट्रवादीच्या पारड्यात पडल्याची समो आली आहेत. यावरून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी तिसरा भिडू सत्तेत आल्याने खाते वाटपात फेरबदल होणार हे अपेक्षित होतं. भाजपची 5 ते 6 खाती गेली आमचं एखादं दुसरं खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाईल हे वाटत होतं. तर अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलं असलं तरी आम्ही सत्तेत एकत्र आहोत. आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी काम करून घेणं आपली जबाबदारी असते. कुणीही अर्थमंत्री असला, उपमुख्यमंत्री असला, आपली बाजू पटवून सांगितली तरी ते मदत करतात असेही गुलाबराव पाटील म्हणाले.