अपत्रातेप्रकरणी आलेल्या नोटीसांवर शिवसेना नेता म्हणाला, ‘…मात्र अध्यक्ष सद्सदद्विवेकबुद्धीने निर्णय घेतील’
सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे. नोटीस बजावून सभापतींना लवकरच निर्णय घेण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. यावरून सध्या राज्याच्या राजकारण खळबळ उडालेली आहे.
जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय न घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे. नोटीस बजावून सभापतींना लवकरच निर्णय घेण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. यावरून सध्या राज्याच्या राजकारण खळबळ उडालेली आहे. याच विषयावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी, शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या अपत्रातेप्रकरणी नोटीसा येणं त्याला अध्यक्षांनी उत्तर देणं ही एक न्यायालयीन प्रक्रिया आहे. यात आमचा कोणाचाही हस्तक्षेप नाही. मात्र अध्यक्ष सद्सदद्विवेकबुद्धीने निर्णय घेतील, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे. ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर शिवसेना शिंदे गटाच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. याप्रकरणी येत्या दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश विधानसभेचे सभापती नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.