खरे संविधानाचे रक्षक आम्हीच, भाजपाचे नेते आशिष शेलार यांचा दावा
शिवसेनेचे मुंबई दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या संकल्प मेळाव्यात भाजपा नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी यावेळी केला आहे.
मुंबई :विरोध सतत गद्दार म्हणून एकनाथ शिंदे आणि आमदारांचा उल्लेख करीत असतात. परंतू खरे गद्दार तर उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करीत एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनविण्याऐवजी स्वत: मुख्यमंत्री बनून एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून बाहेर पडायला भाग पाडल्याची टीका भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे. शिवसेनेचे मुंबई दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या संकल्प मेळाव्यात आशिष शेलार बोलत होते. आशिष शेलार यांनी देव, देश आणि धर्मासाठी धनुष्यबाणाला साथ देऊन राहुल शेवाळे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी दिल्लीत पाठवा असे आवाहन केले. उद्धव ठाकरे यांनी अफझल गुरुच्या फाशीला विरोध करणाऱ्या लोकांशी युती केली आहे. बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेमन याच्या फाशीला विरोध करणाऱ्या अस्लम शेख यांच्या मांडीशी मांडी उद्धव ठाकरे यांनी लावली आहे. त्यामुळे या लोकांना रोखण्यासाठी धनुष्यबाणाला मतदान करुन राहुल शेवाळे यांनी अडीच लाखांच्या मताधिक्क्याने निवडून आणण्याचे आवाहन शेलार यांनी यावेळी केले. संविधान बदलणार असा भ्रम पसरविला जात आहे. संविधान आणि लोकसभेसमोर नतमस्तक होणारे नरेंद्र मोदी पहिलेच पंतप्रधान आहेत. भाजपाने संविधान दिन सुरु केला. डॉ. आंबेडकर बाबासाहेबाचे दिल्लीतील निवासस्थान असो वा लंडनमधील निवासस्थान असो किंवा चैत्यभूमी, इंदूमिल येथील बाबासाहेबांचे स्मारक, मध्य प्रदेशातील महु येथील जन्मस्थान यांचा विकास महायुतीच्या सरकारच्या काळात झाला असल्याने खरे. शिवसेनेने तर मुंबई दक्षिण मुंबईत दलित वर्षा गायकवाड यांना तिकीट नाकारुन अनिल देसाई यांना तिकीट देऊन ते कसे दलित विरोधक आहेत हे सिद्ध केल्याचा आरोपही भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे.