Priyanka Chaturvedi On Shinde | हम दो केंद्र में , हमारे दो महाराष्ट्रमें, प्रियांका चतुर्वेदी यांचा मार्मिक टोला

Priyanka Chaturvedi On Shinde | “हम दो केंद्र में , हमारे दो महाराष्ट्रमें”, प्रियांका चतुर्वेदी यांचा मार्मिक टोला

| Updated on: Aug 05, 2022 | 3:19 PM

Priyanka Chaturvedi On Shinde | "हम दो केंद्र में , हमारे दो महाराष्ट्रमें" या नीतीने कुठलेही सरकार फार काळ टिकत नाही, प्रियंका चतुर्वेदी यांची भाजपवर मार्मिक टोला

Priyanka Chaturvedi On Shinde | “हम दो केंद्र में , हमारे दो महाराष्ट्रमें” या नीतीने कुठलेही सरकार फार काळ टिकत नाही असा मार्मिक टोला शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi)यांची भाजपला लगावला आहे. 40 जणांनी आत्मघाताचा मार्ग निवडल्याचे सांगत हे सर्व विश्वासघातकी लोक आहेत. त्यामुळेच मंत्रीमंडळाचा विस्तार ( Cabinet Expansion) सातत्याने लांबणीवर पडत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) टिपणी जरी पाहिल्यात तरी लगेच लक्षात येईल की बंडखोरांबाबत जनतेसोबत न्यायव्यवस्थेचे काय मत झाले आहे ते. मंत्रीमंडळाचा विस्तारादरम्यान या 40 जणांमध्ये निश्चितच लाथाळ्या होतील आणि उभा महाराष्ट्र हे दृष्य बघेल असे त्यांनी सांगितले. पण वाईट याच गोष्टीचं वाटतं की या लोकांच्या स्वार्थामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं चांगलं सरकार सत्तेबाहेर पडले. हे सरकार अवैध असल्याची जाणीव भाजपला (BJP) सर्वाधिक आहे. त्यामुळेच मंत्रीमंडळाचा विस्तार थांबलेला आहे. कोणाला मंत्रीमंडळात घ्यावा आणि कोणाला बाहेर थांबवावं असा प्रश्न आहे. या प्रश्नावरुन हे सरकार ही कोसळू शकतं, असं त्यांनी सांगितलं.

Published on: Aug 05, 2022 03:18 PM