आम्ही बंड नाही उठाव केला- गुलाबराव पाटील
शिंदे गट आणि भाजपने बहुमत चाचणी जिंकल्यानंतर सभागृहात आमदारांचे भाषण झाले. यावेळी गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली. 40 आमदार जेव्हा फुटतात तेव्हा ही आताची आग नाही असे ते म्हणाले. साधा कार्यकर्ता फुटणार असेल तर मी त्याची रात्र रात्रभर समजूत काढायचो अशावेळी इतकी मोठी घटना घडत असेल तर नक्कीच त्याला तसे कारण आहे. […]
शिंदे गट आणि भाजपने बहुमत चाचणी जिंकल्यानंतर सभागृहात आमदारांचे भाषण झाले. यावेळी गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली. 40 आमदार जेव्हा फुटतात तेव्हा ही आताची आग नाही असे ते म्हणाले. साधा कार्यकर्ता फुटणार असेल तर मी त्याची रात्र रात्रभर समजूत काढायचो अशावेळी इतकी मोठी घटना घडत असेल तर नक्कीच त्याला तसे कारण आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या एकाही आमदाराचे काम होत नसल्यामुळे आमदारांमध्ये नाराजी होती असेही ते म्हणाले. आम्ही बंड नाही तर उठाव केला असं म्हणत त्यांनी बंडखोरीचे समर्थन केले. आज शिंदे गट आणि भाजप यांना बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान होते. सभागृहात 164 मतं घेत त्यांनी बहुमत सिद्ध केले. सभागृहात दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपाचा खेळ रंगला.
Published on: Jul 04, 2022 02:59 PM
Latest Videos