MUKESH AMBANI : 'आमच्याकडे सर्वोत्तम शूटर...', उद्योगपती मुकेश अंबानी यांना कुणी दिली धमकी?

MUKESH AMBANI : ‘आमच्याकडे सर्वोत्तम शूटर…’, उद्योगपती मुकेश अंबानी यांना कुणी दिली धमकी?

| Updated on: Oct 28, 2023 | 5:28 PM

रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना ई मेलच्या माध्यमातून धमकी देण्यात आलीय. याबाबत गावदेवी पोलिसांमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलाय. पोलीस याचा तपास करत आहेत. याधीही मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी ही धमकी गांभीर्याने घेतलीय.

मुंबई | 28 ऑक्टोबर 2023 : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा ई मेल आलाय. 27 ऑक्टोबर रोजी हा ई मेल आला आहे. या ई मेलच्या आधारे अंबानी यांच्या सिक्युरिटी इन्चार्जने गावदेवी पोलिसात तक्रार दाखल केलीय. पोलिसांनी कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने 20 कोटी रुपयांची मागणी केली आहे. पैसे दिले नाहीत तर जीव गमवावा लागेल. आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम शूटर आहेत असा इशाराही या ई-मेलच्या माध्यमातून मुकेश अंबानी यांना देण्यात आलाय.

Published on: Oct 28, 2023 05:25 PM