Bacchu Kadu On Raj Thackeray : भोंगे उतरवल्यानं देश चालत नाही, परिस्थितीतून आपण बाहेर आलो पाहिजे

Bacchu Kadu On Raj Thackeray : भोंगे उतरवल्यानं देश चालत नाही, परिस्थितीतून आपण बाहेर आलो पाहिजे

| Updated on: Apr 30, 2022 | 8:32 PM

आमच्या सारख्या राजकीय नेत्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलायला हवं. तर जे मिडियावाले विकास सोडून भोंग्याचा विषय दाखवत असतील त्यांच्यावरही बंदी आणली पाहिजे.

Bacchu Kadu On Raj Thackeray : सध्या राज्यासह देशात भोंग्यालरून जे राजकारण (Politics) तापलं आहे त्यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, सभा कोठे होते? देशात होते की पाकिस्तानात होते. भोंगे हा देशाचा विषय होऊ शकत नाही. देशाच्या विकासाचा विषय होऊ शकत नाही. भोंगे उतरायचे असतील तर सगळ्यांचेच उतरावे लागतील. तर महत्वाचे म्हणजे प्रचारात वापरण्यात येणारे राजकीय भोंगे (Bhonge) आधी बंद करायला पाहिजेत. अचारसंहिता (Code of Conduct) लागू करून हा भोंगा एकच दिवस वाजायला हवा. हा भोंग्याचा विषय काही विकासा नाही. आमच्या सारख्या राजकीय नेत्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलायला हवं. तर जे मिडियावाले विकास सोडून भोंग्याचा विषय दाखवत असतील त्यांच्यावरही बंदी आणली पाहिजे.