EXCLUSIVE : त्याग करावा लागतो, त्याशिवाय आपलं राज्य आणता येत नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ‘tv9 मराठी’ला Exclusive प्रतिक्रिया
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल प्रथमच त्यांच्या ठाण्यात घरी गेले. त्यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नागपुरला जात आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'tv9 मराठी'ला EXCLUSIVE प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि भाजप (BJP) यांचं सरकार सत्तेत आलंय. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल प्रथमच त्यांच्या ठाण्यात घरी गेले. त्यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नागपुरला जात आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच देवेंद्र फडणवीस आज नागपुरात जात असून त्याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. त्यांच्या स्वागतासाठी मोठी तयारी करण्यात आली. फडणवीसांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्ते उत्सुक आहेत. फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) देखील नागपुरात जात आहेत. नुकतंच एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारचा नुकताच शपथविधी झाला. तर विधानसभेतील दोन दिवसीय विशेष अधिवेशनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारनं बहुमतापेक्षा मोठा आकडा गाठून आपलं सरकार मजूबत असल्याचं दाखवून दिलंय. दरम्यान, काल राज्याचे मुख्यमंत्री (CM) एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनल्यानंतर प्रथमच ठाण्यातील त्यांच्या घरी गेले. यावेळी त्यांचं धुमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. ढोलताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचं स्वागत झालं. तर आज उपमुख्यमंत्री नागपुरात जात आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘tv9 मराठी’ला EXCLUSIVE प्रतिक्रिया दिली आहे.