Kishor Patil On Shivsena | अजून आम्ही कोण हेच आम्हाला माहिती नाही, उगा टीका करता कशाला, आमदार किशोर पाटील यांचा टोला

Kishor Patil On Shivsena | अजून आम्ही कोण हेच आम्हाला माहिती नाही, उगा टीका करता कशाला, आमदार किशोर पाटील यांचा टोला

| Updated on: Aug 02, 2022 | 2:34 PM

Kishor Patil On Shivsena | अजून आम्ही कोण हेच आम्हाला माहिती नाही, त्यामुळे उगा कशाला आमच्यावर टीका करता अशा टोला जळगावचे आमदार किशोर पाटील यांनी केला लगावला.

Kishor Patil On Shivsena | अजून आम्ही कोण हेच आम्हाला माहिती नाही, त्यामुळे उगा कशाला आमच्यावर टीका करता अशा टोला जळगावचे आमदार किशोर पाटील (MLA Kishor Patil) यांनी केला लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 40 आमदारांची मोट बांधून जून महिन्याच्या शेवटी शिवसेनेला भगदाड पाडलं. अगोदर सूरत आणि नंतर हा गट गुवाहाटी येथे सक्रीय राहिला. त्यानंतर अनेक आमदारांनी आणि त्यानंतर अशातच काही खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि शिवसेना पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग (Outgoing) सुरु झाले. ते अद्यापही थांबलेलं नसल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेतून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी बंडखोरांवर शाब्दिक हल्ले चढवले. ठाकरे यांनी तर सातत्याने त्यांच्यावर गद्दार असा शिक्का मारणे सूरू केले आहे. या सर्व घडामोडीवर किशोर पाटील यांनी त्यांचं मन मोकळं केलं.