संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो, शरद पवार म्हणाले…
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज बीडच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दु:खात बुडालेल्या त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना मदतीचे आश्वासन दिले. मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेत आहोत असेही शरद पवार यांनी सांगितले.
बीड येथील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देखमुख यांची अत्यंत निघृणपण हत्या झाल्यानंतर या गावात अजूनही दहशतीचे वातावरण आहे. देशमुख यांच्या पीडीत कुटुंबियांची राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. संतोष देशमुख यांच्या मुलीच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत. बारामतीला दहा हजार विद्यार्थीनी शिकत आहेत. त्यात तिलाही शिक्षण देऊ, तसेच मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही उचलू असेही शरद पवार यावेळी म्हणाले. बीडमध्ये असं घडतंय ही गोष्ट आम्हा तुम्हाला न शोभणारी आहे असे शरद पवार यांनी म्हटले आहे. याच्या खोलात जाऊन तपास केला पाहीजे आणि दोषींना शिक्षा झाली पाहीजे अशी मागणी मी शासनाकडे करणार असल्याची शरद पवार यांनी म्हटले आहे.
Published on: Dec 21, 2024 05:14 PM
Latest Videos