जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस; एकाच दिवशी सर्वात जास्त पावसाची नोंद!

जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस; एकाच दिवशी सर्वात जास्त पावसाची नोंद!

| Updated on: Jul 23, 2023 | 11:22 AM

जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, जळगाव, धरणगाव तालुक्यामध्ये शनिवारी दमदार पावासाने हजेरी लावली. जुलै महिन्यात जळगावात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव, 23 जुलै 2023 | जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, जळगाव, धरणगाव तालुक्यामध्ये शनिवारी दमदार पावासाने हजेरी लावली. जुलै महिन्यात जळगावात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी दुपारपर्यंत एकूण 35 मिमी पावसाची नोंद झाली होती. जळगाव शहरात या हंगामातील सर्वाधिक म्हणजेच एकाच दिवसात 40 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. नेहमी महिन्यात जिल्ह्यात 123 मिमी सरासरी पाऊस होतो. यंदा मात्र केवळ 45 मिमी पाऊस झाला होता. तर जुलै महिन्यात एकूण 189 मिमी पाऊस होत असतो, 22 जुलैपर्यंत जळगाव जिल्ह्यात एकूण 250 मिमी पाऊस झाला आहे.

Published on: Jul 23, 2023 11:22 AM