कोकण, विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज; मराठवाड्याच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस
विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर उर्वरीत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असे हवामान खात्याने म्हटले आहे.
कोकण, विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असेही हवामान विभागाने म्हटले आहे. उर्वरित राज्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.
Latest Videos