Sharad Pawar यांचं Nagpur मध्ये जल्लोषात स्वागत
नागपुरात विमानतळावर (Nagpur airport) चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. शरद पवार यांनी कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ स्वीकारले आहेत. मोठ्या संख्येने सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. कुणालाही शरद पवार (Sharad Pawar) यांच्या जवळ जाऊ दिलं जात नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी (NCP activists) पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार हे गाडीत बसले.
नागपुरात विमानतळावर (Nagpur airport) चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. शरद पवार यांनी कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ स्वीकारले आहेत. मोठ्या संख्येने सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. कुणालाही शरद पवार (Sharad Pawar) यांच्या जवळ जाऊ दिलं जात नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी (NCP activists) पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार हे गाडीत बसले. अमरावतीच्या दिशेने रवाना झालेत. नागपूर-अमरावती या मार्गावरही चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्ला झाला.त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पश्चिम विदर्भातल्या कार्यकर्त्यांचा हा मेळावा अमरावती येथे होत आहे.
वर्धेचे पालकमंत्री सुनील केदार हेसुद्धा या दौऱ्यासाठी रवाना झालेत. पश्चिम विदर्भात राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. विदर्भात 62 पैकी फक्त सहा विधानसभा राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. त्यामुळं राष्ट्रवादीची ताकद वाढविता येईल, यासाठी मोठे नेते पवारांसोबत आहेत. अनिल देशमुख हे तुरुंगात आहेत. अशा पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.