Gautami Patil | गौतमीवर आता प्रसिद्ध नृत्यागंणाचं भडकली; ‘बिहारमध्ये अशा गोष्टी, या लोकांनी रंगमंचाचा डान्सबार ’
ती सध्या कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असतेच. मध्यंतरी ती तिच्या पाटील या अडणावावरून चांगलीच चर्चेत आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. पण यावेळी ती पोलीस केस, नेत्याची टीका किंवा लग्नाची मागणी यामुळे चर्चेत आलेली नाही. तर यावेळी तिच्यावर एका प्रसिद्ध नृत्यांगनेनं टीकास्त्र सोडलं आहे.
सोलापूर : सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील ही तिच्या घायाळ अदा आणि नृत्यामुळं महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. ती सध्या कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असतेच. मध्यंतरी ती तिच्या पाटील या अडणावावरून चांगलीच चर्चेत आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. पण यावेळी ती पोलीस केस, नेत्याची टीका किंवा लग्नाची मागणी यामुळे चर्चेत आलेली नाही. तर यावेळी तिच्यावर एका प्रसिद्ध नृत्यांगनेनं टीकास्त्र सोडलं आहे. तर तिच्या नृत्यावर आक्षेप घेतला आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार हिने गौतमीवर टीका केली आहे. माधुरीनं गौतमीचं नाव न घेता तिच्यावर करताना म्हणाली, “गौतमी करत असलेल्या नृत्याचा प्रकार कोणता आहे? मला माहित नाही. नृत्य करणाऱ्याला तर त्याची माहिती असावी. आपण कोणता नृत्य प्रकार करत आहोत. मी कधी तिचा कार्यक्रम पाहिलेला नाही. मात्र, पाहिल्यावर कळेल तिचा नृत्य प्रकार कोणता आहे.” तर कुठेतरी असं वाटतं की कलेचं नुकसान होतंय. जे लोक डान्स करायचा म्हणून काहीही करतात त्याच्यासमोर दोन पोरं नाचताना दिसतात. त्यांच्या मागे असणाऱ्या मुली तिच्या इशाऱ्यावर नाचतात. तर बिहारमध्ये अशा गोष्टी व्हायच्या. तुम्ही जर लावणी करणार असाल तर त्या वेशभूषेत तुम्हाला प्रॉपर यावं लागत. पायात घुंगरू घालण्याचं सुद्धा काहीतरी कारण आहे ना. नाहीतर ह्यांनी जी घाण करून ठेवली ए ना ती आम्हालाच साफ करावी लागणार आहे. या लोकांनी रंगमंचाचा डान्सबार करून ठेवला आहे.