जयपूर – मुंबई पॅसेंजर गोळीबार? गोळीबारानंतर लोकलची विस्कळली, प्रवाशांचे हाल
घटना दहिसर ते मीरा रोड दरम्यान घडल्याचे बोलले जात आहे. तर झालेल्या या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे. तर ही गोळीबार आरपीएफच्या कॉन्स्टेबलनेच केला आहे.
मुंबई, 31 जुलै 2023 | जयपूर ते मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दहिसर ते मीरा रोड दरम्यान घडल्याचे बोलले जात आहे. तर झालेल्या या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे. तर ही गोळीबार आरपीएफच्या कॉन्स्टेबलनेच केला आहे. तर आरोपी कॉन्स्टेबलला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र या घटनेचा थेट मुंबई लोकलवर परिणाम झाला असून पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतुक 15 ते 20 मिनिटे उशिराने होत आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
Published on: Jul 31, 2023 10:51 AM
Latest Videos