ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

| Updated on: May 09, 2022 | 11:05 AM

पश्चिम रेल्वेवर (Western Railway) बोरीवली ते विरार दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली (overhead wire snaps) आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील जलद लोकल (fast local) बंद आहेत. पाऊण तासापूर्वी ही ओव्हरहेड वाहर तुटली आहे. बोरिवली-विरार रेल्वे मार्गाची ओव्हरहेड वायर तुटल्याने बोरिवली ते विरार जलद लोकल सेवा बंद करण्यात आली आहे.

मुंबई: पश्चिम रेल्वेवर (Western Railway) बोरीवली ते विरार दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली (overhead wire snaps) आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील जलद लोकल (fast local) बंद आहेत. पाऊण तासापूर्वी ही ओव्हरहेड वाहर तुटली आहे. बोरिवली-विरार रेल्वे मार्गाची ओव्हरहेड वायर तुटल्याने बोरिवली ते विरार जलद लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. विरार ते बोरिवली आणि बोरीवली ते विरार या जलद लोकल सेवा सुमारे अर्धा तास बंद आहेत. त्यामुळे ऐन सकाळीच ओव्हरहेड वायर तुटल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. सध्या विरार ते बोरिवली आणि बोरिवली ते विरार ये-जा करण्यासाठी धीम्या लोकल सेवा सुरू आहेत. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने ओव्हरहेड वायर बांधण्याचे काम हाती घेतले आहे. युद्धपातळीवर हे काम सुरू असून लवकरच दुरुस्तीचे काम करून लोकल सेवा पूर्ववत केली जाणार असल्याचं रेल्वे प्रशासनाने सांगितलं. मात्र, कितीवेळेत हे काम पूर्ण होईल हे अद्याप सांगण्यात आलेलं नाही.

Published on: May 09, 2022 11:05 AM