ही सुरुवात आहे, गुलाल उधळलाय..येत्या विधानसभेला, मोठ्या विजयानंतर काय म्हणाले आदित्य?

ही सुरुवात आहे, गुलाल उधळलाय..येत्या विधानसभेला, मोठ्या विजयानंतर काय म्हणाले आदित्य?

| Updated on: Sep 28, 2024 | 2:58 PM

राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. राज्याला गृहमंत्री आहे की नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हाय अलर्ट रोजचाच आहे. महापालिकेच्या निवडणुका घ्या, त्या दोन वर्ष प्रलंबित आहे. विधानसभेच्या निवडणुकाही घ्या असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूकांत दहाच्या दहा जागा आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेने जिंकल्या आहे. या मोठ्या विजयानंतर मातोश्रीवर गुलाल उधळत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी आदित्य म्हणाले की मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक मागच्या वर्षी होणार होती ती मिंधे सरकारने रद्द केली. वारंवार ते कोर्टात केले. तरी कोर्टाने न्याय दिला आहे.ही आजपासूनची सुरुवात आहे. गुलाल उधळला आहे. हाच गुलाल विधानसभेच्या निवडणुकीला उधळायचा आहे. त्यासाठी कामाला लागा.आपल्यावर जनतेने जो विश्वास दाखवला आहे. तोच विश्वास उद्धव ठाकरेंवर जनता विश्वास दाखवल्याशिवाय राहणार नाही असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. हा दस का दम आहे. 2008 मध्ये 10 पैकी 8 जागा जिंकल्या. त्यानंतर 2018 दहा पैकी दहा जिंकल्या. आता पुन्हा दहा पैकी दहा जागा जिंकल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. ही विधानसभेची लिटमस टेस्ट नव्हती. ही प्रिपरेशनची रन होती.तयारी होती. ज्यांना पक्ष सोडून जायचं त्यांना जाऊ द्या. जनतेचा आमच्यावर जो विश्वास आहे, तो कायम आहे. पदधवीधर आणि शिक्षक मतदारसंघ आम्ही जिंकलो आहोत. आता सिनेटही जिंकली आहे असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

Published on: Sep 28, 2024 02:57 PM