Beed Morcha : ‘…यातून न्याय मिळाला नाही तर शिवाजी महाराज…,’ काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर विरोधकांनी शनिवारी बीड जिल्ह्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आल होते. या मोर्च्यात भाषण करताना संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला एक प्रकारे इशारा दिला.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर विरोधकांनी आज बीड येथे मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात अनेक नेत्यांची भाषणे झाली. यात संभाजीराजे छत्रपती यांचे देखील भाषण झाले. ते म्हणाले की ही आणलेली लोकं नाही. माणुसकी जपण्यासाठी हे लोक आले आहेत. राजकारणाच्या पलिकडे आपण विचार करू या असेही संभाजीराजे यावेळी म्हणाले. संतोष देशमुख हे निमित्त आहे. गेल्या २० वर्षांतला बीडचा गुन्हेगारी पाहीली की हादरा बसतो. ती यादी पाहूणच मला धक्का बसला. एका जिल्ह्यात १२०० ते १३०० बंदुकांचे लायसन्स. मंत्र्याच्या हातात देखील बंदूक. खरं तर बंदुकी हातात घेण्याचा अधिकार आम्हाला आहे. पण आम्ही कधी घेतली नाही. साडे तीनशे वर्षापासून आम्हाला अधिकार आहे. पण आम्ही कधी असं केलं नाही. कधी तलवार दाखविली नाही असेही संभाजीराजे यावेळी म्हणाले. आपल्याला यातून जर न्याय मिळाला नाही, तर शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचा विचार बुडीत घालणार. मी तुमच्यासोबत शेवटपर्यंत असेल. मी काय काय करणार आहे. मी इथे बोलणार नाही. मी काय जबाबदारी घेतली हे देखमुख यांच्या कुटुंबियांना सांगितलं आहे. मी जो शब्द दिला आहे. तो पूर्ण करेल असेही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.