सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा

सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा

| Updated on: Dec 25, 2024 | 4:42 PM

काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी लसूणाचे भाव वाढल्याचा दिल्लीतील मंडईतील एक व्हिडीओ काल सोशल मीडियावर शेअर केला. सोलापूरातील कृषी उत्पन्न बाजारात लसणाचे दर काय आहेत पाहा....

सोलापूरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे भाव खाली वर होताना दिसत आहेत. सोलापूरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्य प्रदेशातून लसणाची आवक होत आहे. या लसणाचे भाव कमी जास्त होताना पाहायला मिळत आहे. साधारणपणे १७० रुपये ते २६० रुपये किलो असा लसणाचा दर वरखाली होत आहे. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील भाजी मंडईत जाऊन भाज्यांचे दर किती महागले आहेत, याचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात लसणाच्या भावा संदर्भात भाष्य केले होते. सोलापूरात सध्या लसणाचा सरासरी भाव किलोला दोनशे रुपये इतका आहे. कांदा देखील कृषी उत्पन्न बाजारात जरी महाग असला तरी बाजारात तो तितकासा महाग नाही. परंतू सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाची आवक घटली आहे.

Published on: Dec 25, 2024 04:37 PM